Friday, October 10, 2008

उद्धवचा उदय


कोणी म्हणतं ते आक्रमक नाहीत...
कोणी ओरडंत ते बाळासाहेबांचा वापर करतात...
कोणी हेटाळणी करतं ते शिवसेना संपवायला निघालेत...
उद्धव ठाकरे हे राजकारणात आल्यापासून त्यांच्यावर सतत हे आरोप होत आहेत.मात्र शिवसेनेचा या वर्षीचा दसरा मेळावा ज्यांनी बघितला असेल त्या सर्वांना आता नक्की समजलंय की उद्धव हेच भावी शिवसेनाप्रमुख आहेत.
बाळासाहेबांचा मुलगा म्हणून त्यांना राजकीय पक्ष वंश परंपरेनं मिळाला असेल मात्र या दसरा मेळाव्याला आलेले अनेक सैनीक त्यांनी स्वत: कष्ट करुन मिळवलेत.केवळ राड्यांची भाषा करणा-या शिवसैनीकांचे नवे नेते मात्र त्यांच्यापासून संपूर्ण वेगळे आहेत. केवळ विरोधी पक्षचं नाही तर परप्रांतीय,मुस्लीम या सेनेच्या परंपरागत शत्रूंच्या विरोधातही त्यांनी आतापर्यँत कधी मर्यादेच्या पलीकडं जाऊन (त्याला ' ठाकरी भाषा' असं म्हणातात का ??? ) टिका केलेली नाही.उलंट उद्धव प्रकाशात आले ते मी मुंबईकर या नव्या अभियानामुळं...
ज्या मुद्यांवर आणि ज्या माणंसांच्या जीवावर बाळासाहेबांनी शिवसेना सुरु केली ते मुद्दे आणी माणंस आता बदलंत चाललीत.21 व्या शतकात राजकारण आणि अर्थकारण यांची एकमेंकामधली गुंतागुत वाढलीय..एखाद्या समाजाला एखाद्या व्यक्तीला विरोध करुन दिर्घकाळ यशस्वी होण्यास आता मर्यादा पडतायत.त्यामुळेंच सर्वांना जोडणारं बेरजेचे राजकारण करणारा नेताचं आता राजकारणात यशस्वी होऊ शकतो.हे उद्धव ठाकरेंनी कदाचीत ओळखल असावं..त्यामुळेचं सेनेच्या मुळ गाभ्यालाच धक्का देत उद्धव यांनी मी मुंबईकर हे आंदोलनं सुरु केल होतं..मात्र राज ठाकरे यांनी मराठीचा गजर करत हे आंदोलनचं उधळून लावलं.उद्धवच्या राजकारणाला बसलेला हा पहिला धक्का होता.
मात्र उद्धवना त्याही पेक्षा मोठे धक्के दिले नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी.' स्वाभिमाना ' ची भाषा करत राणेंनी पक्ष सोडला.मालवणच्या पोटनिवडणुकीत राणेंना अनुकूल अशी जबरदस्त हवा होती.भाजपासहं शिवसेनेतल्या अनेक उद्धव विरोधकांचं राणेंना त्याकाळात पाठबळ होत..तरीही उद्धवही हरणारी लढाई नेटानं लढले.राणेंच्यातबालेकिल्याच चक्क मालवणात प्रत्येक गल्लीबोळ त्यांनी त्या निवडणुकीत पिंजून काढलं.ते निवडणुक हरले मात्र ते दरबारी राजकारणी आहेत हा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला असं म्हणता येईल..नंतर आधी श्रीवर्धन आणि रामटेकच्या निवडणुका जिंकत त्यांनी राणेंचा झंझावात रोखला.मात्र मुंबई महापालिका निवडणुक त्यांची खरी परीक्षा होती....
केवळ नारायण राणेचं नाही तर शिवसेनेतले प्रती ठाकरे समजले जाणारे राज ही 'नवनिर्माणाचा' नवा नारा देत त्यांच्या विरोधात उभे होते.बाळासाहेंबासारखा हुकमी एक्का शरपंजरी अवस्थेत असताना उद्धव यांनी ही निवडणुक स्वत:च्या हिमतीवर आणि देसाई,राऊत नार्वेकर यांच्या मदतीनं लढवली.सर्व राजकीय विरोधकांचे आंदाज चुकवून शिवसेनंनं मुंबई महापालीका राखली याचं श्रेय उद्धव ठाकरे यांनाच आहे.
या विजयामुळं शिवसेनेमधलं 'आऊटगोईंग' ब-याच प्रमाणात कमी झालं.हाच काळ पक्षाच्या बांधणीकरता उद्धव यांनी वापरला.शेतक-यांची कर्जमाफी,भारनियमन,ऊस आंदोलकांच्या प्रश्नावर उद्धव यांनी सारा महाराष्ट्र पिंजून काढला.परभणी,धुळे,चंद्रपूर,कोल्हापूर सारख्या राज्याच्या वेगवेगळ्या भागात याकाळात उद्धवच्या सभा या काळात यशस्वी झाल्या.शिवसेना संपवायला निघालेल्या उद्वव ठाकरेंच्या सभेला सामान्य मराठी माणसांचा हा प्रतिसाद होता.
उद्धव ठाकरे हे रसायन सनातन शिवसैनिकांपेक्षा वेगळं आहे. काही बाबतीत ते थेट शरद पवारांसारखे आहेत असं मला वाटतं.पवारांप्रमाणेचं त्यांच्या मनाचा ठावं घेणं अवघड आहे.पवारांप्रमाणेच पक्षांतर्गत विरोधकाला जाहीरपणे न दुखावता अडगळीत टाकण्याची कला त्यांनाही अवगत आहे.मात्र उद्धव यांच्यामागे बाळासाहेबांची शक्ती आहे.याबाबतीत ते पवार,राणे किंवा राज यांच्यापेक्षा नक्कीच उजवे ठरतात.ज्या शिवसैनीकांना दसरा मेळाव्यात फक्त आणि फक्त बाळासाहेबांचे विचार ऐकण्याची सवय आहे...त्या सवयीला उद्वव यांनी यावेळी धक्का दिला.
त्यांच्या भाषणात अटलजींचा गोडवा नाही,बाळासाहेबांसारखा मिश्कीलपणा नाही किंवा राज सारखा आक्रमकपणा नाही.. मात्र शिवसैनीकांना बांधुन ठेवणारी शक्ती नक्कीच आहे.पक्षाचा अजेंडा सांगणारं भाषण बाळासाहेबांचं नाही तर उद्दव यांच होत.हे यावेळी सगळ्यांनाच यंदा संमजलं.
एक नेता,एक मैदान,एक विचार या शिवसेनेच्या दस-या मेळाव्याच्या घोषणेतला एक नेता हा शब्द बदलण्याची वेळ आता आली आहे.हे शिवाजी पार्कच्या गर्दीला यंदा समजलं असावं.भावी शिवसेना प्रमुखाचा उदय आता झाला आहे.यावर्षीचा दसरा मेळाव्याचं हेच मोठं ऐतिहासीक मुल्य आहे.

7 comments:

Niranjan Welankar said...
This comment has been removed by the author.
Niranjan Welankar said...

Atyant sundar vishleshashan ! Lekhakacha Anubvhav ani knowledge dista.

ashishchandorkar said...

Masta re changle lihile ahe... Uddahv thakre ha khup motha neta ahe... analysis changle ahe...
Ashish Chandorkar

anilpaulkar said...

great! Dear i'm very happy to read your article. congrats!

Ameya Gambhir (अमेय गंभीर) said...

आज महाराष्ट्राला गरज आहे ती एका समतोल पण कणखर नेतृत्वाची ! भावनांशी खेळून काही काळ सत्त्ता हस्तगत होईलही; पण असा नेता जर महाराष्ट्रापुढील महा-समस्या सोडवू नाही शकला तर त्याची शकले व्हायला वेळ नाही लागणार, ममता बाईंचे उदाहरण ताजे आहे; सत्तेवर डोळा ठेवून ज्या शेतकर्यांच्या भावनांशी त्या खेळल्या; त्यांच्या हातात आज केवळ धुपाटणे राहिलेय.आपला ’वापर’ झालेला त्यांच्या लक्षात आल्याने ते आज हात धुवून बाईंच्या मागे लागलेत. जागतिक राजकारणातही कित्येक उदाहरणे ताजी आहेत, मग ते तालिबान असो अथवा पाकिस्तानतले कट्टर मौलवी; बुमरॅंग बनून ते त्यांच्या जन्मदात्यावरच उलटलेत.

एकेकाळचे अग्रेसर असलेले राज्य आज बकालीत जगतेय. पुरेशी वीज नाही म्हणून नॅनोला नाकारायची नामुष्की ओढावलीय,
अगदी साध्या उदाहरणाने तुलना करायची झाल्यास एक नजर टाकून पाहा आजुबाजूची राज्ये, तिथली परिवहन मंडळे, तिथल्या एस टी स्टॅंडवरील स्व्च्छतागृहे आणि आपलया यस्ट्या... नुसतीच मराठी अस्मिता कवटाळून पोट भरणारेय का?

Vinod Patil said...

लेखन शैली खरच अप्रतिम आहे. विचारांची जुळवा जुळव प्रकर्षानं जाणवते. लिहता लेखन म्हणतात ते असं. लिहीत राहा अजून प्रतिभा खुलेल.शुभेच्छा...
काय साहेब, कोणत्या अजेंड्याच्या गोष्टी त्यांनी शिवतिर्थावर केल्यात? आणि तुम्ही म्हणता सनातनाची वाट सोडून उद्धवांनी विकासाच्या मुद्दयाची कास धरली आहे. मात्र त्यांच्या भाषणात पुन्हा पुन्हा येणारा चाफेकर बंधुंचा उल्लेख आणि 1857 च्या लढ्याचा संदर्भामुळं हिंदुत्व मुल्य अजुनही शिवसेनेत किती खोलवर रुतलेलं आहे याचीच ग्वाही देत होतं. दुसरी गोष्ट, उद्धवला असलेली बेरजेच्या राजकारणाच्या जाणीवेची भाषा तुम्ही वापरली. अहो त्यांनी हिंदुत्वाचा नारा देऊन मुंबईतली हिंदी भाषीकांची मतं शिवसेनेकडे आकर्षीत करण्याचाच त्यांचा हा खटाटोप होता. आणि मराठीच्या मुद्दयाशी प्रतारणाही. खरं तर राजच्या जवळ गमावायला काही नाही. त्यामुळं त्यानं आपला लढा मर्यादित करत मराठीच्या मुद्यावर लक्ष केंद्रीत केलय. यातुन त्याला जेही काही मिळेल तो त्याचा निव्वळ नफा असेल. उद्धवची परिस्थिती मात्र पुर्णपणे उलट आहे. त्याच्या पक्षाकडे भविष्यातील सत्ताधारी पक्ष म्हणून पाहिलं जातय. त्यामुळं त्याला गमावण्याची भिती आहे. आणि याच भिती पायी मराठीच्या मुद्दानं जन्माला आलेली शिवसेना आता या मुद्दयाशी प्रतारण करून हिंदुत्वाचा नारा देऊन मुंबईतील हिंदी भाषिकांच्या मतावर डोळा ठेऊन आहे. मला आक्षेप त्यांनी हिंदी भाषिकांचे लांगुल चालण करण्यावर नाही. माक्षा आक्षेप आहे तो त्यांच्या भुमिकेचा. ते म्हणतात राज आमचा मराठीचा मुद्दा हायजॅक करू पाहत आहे. अहो तुमची भुमिका फिकी पडली म्हणून तर पोकळी निर्माण झाली. आणि राजनं त्याच्याच फायदा उचलत ही पोकळी भरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं हिंदुत्व,मराठी आणि विकास या सर्व मुद्दांकडे बेरजेच्या राजकारणा पलीकडे जाऊन पाहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आणि त्यावर उद्धव अजुनही ठाम भुमिका घेऊ शकलले नाहीत. शिवसेनेच्या कार्यध्यक्षपदावर विराजमान होऊन बराच काळ लोटला आहे. आणि तरीही ते त्यांच्या शिवतिर्थावरील भाषणाचा उल्लेख मेडन स्पीच म्हणूनच करण्यात येत असेल तर यापेक्षा मोठी शोकांतीका उद्धव यांच्या आयुष्यात अजून यायची आहे. भाषण हे भाषण असते. भुमिका ही भुमिका असते. भाषणाचं ठिकाण बदलून भुमिकेच्या मुल्यांमध्ये वृद्धी होतं नसते. हेच अंतिम सत्य.

Unknown said...

tuzi lihinyachi style chan aahe.mala kharach aawadali.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...