रिकी पॉन्टिंग. ऑस्ट्रेलियाचाच नाही तर क्रिकेट विश्वातला सर्वात यशस्वी कॅप्टन. तब्बल 48 टेस्ट आणि 164 वन-डे ऑस्ट्रेलियानं त्याच्या कॅप्टनसीमध्ये जिंकल्या आहेत. सलग दोन वर्ल्ड कप स्पर्धा जिंकणारा दुसरा कॅप्टन. तीन वर्ल्ड कप विजेत्या टीमचा सदस्य असलेला एकमेव खेळाडू. ऑस्ट्रेलियाचा डॉन ब्रॅडमन नंतरचा सर्वात महान खेळाडू.
ऑस्ट्रेलियाच्या या 36 वर्षाच्या बॅट्समनचे मार्च महिन्याशी अनोखं नात आहे. 23 मार्च 2003 या दिवशी त्यानं आपल्या आयुष्यातलं अविस्मरणीय असं शतक झळकावलं. त्या दिवशी भारतीय बॉलर्सची पिसं काढंत त्यानं 140 रन्सची जबरदस्त इनिंग खेळली आणि आपल्या टीमला वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून दिलं. त्यानंतर 8 वर्षांनी 24 मार्च 2011 मध्ये त्यानं भारताविरुद्ध वर्ल्ड कपमध्ये आणखी एक झुंजार सेंच्युरी झळकावली. प्रचंड दबावाचा सामना करत शतक झळकावण्याची किमया त्यानं केली. मात्र यंदा तो आपल्या टीमचा पराभव वाचवू शकला नाही. 1992 नंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप सेमी फायनल गाठण्यात अपयश आलंय. ऍशेस सीरिजमध्ये झालेल्या मानहानिकारक पराभवानंतर पॉन्टिंगच्या क्रिकेट करियरमधलं आणखी एक काळंकुट्ट पान या वर्षी लिहलं गेलंय. या पराभानंतर क्रिकेटमधलं पॉन्टिंग पर्व संपुष्टात आलंय.
ऑस्ट्रेलियनं टीममध्ये तिशी गाठली तरी देशांतर्गत स्पर्धेमुळे राष्ट्रीय टीममध्ये स्थान मिळवता येत नाही. त्या बाबतीत रिकी पॉन्टिंग सुदैवीचं म्हणावा लागेल. 1995 साली म्हणजे वयाच्या 21 व्या वर्षीच त्याला ऑस्ट्रेलियन टीममध्ये संधी मिळाली. डेव्हिड बून, मार्क वॉ, स्टीव्ह वॉ, इयान हिली आणि मार्क टेलर या सारखे दाद खेळाडू त्यावेळी ऑस्ट्रेलियन टीममध्ये होते. मात्र या सर्वांच्या मांदियाळीमध्ये त्यानं आपली छाप सोडली. त्याच्या भात्यात क्रिकेटमधले सर्व शॉट्स आहेत. मात्र पूल आणि कव्हर ड्राईव्ह मारताना पॉन्टिंगला पाहणं हा विलक्षण अनुभव असायचा. मेलबॉर्न असो की मुंबई, लॉर्डस असो वा लाहोर क्रिकेट खेळणा-या सर्व देशात त्यानं रन्स जमवलेत. क्रिकेट विश्वात फक्त सचिन तेंडुलकरला पॉन्टिंगपेक्षा जास्त रन्स आणि सेंच्युरी झळकवता आल्या आहेत.
एक कॅप्टन म्हणून पॉन्टिंग महान होताचं पण एक कॅप्टन म्हणूनही तो तितकाच जिद्दी, धूर्त आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यशस्वी होता. त्याची टेस्टमध्ये सरासरी आहे 53.51 पण कॅप्टनसीच्या सात वर्षातली सरासरी आहे 59.12. वन-डेमध्ये त्याची कॅप्टन म्हणून असलेली सरासरी ( 51.30 ) ही त्याच्या एकूण सरासरीपेक्षा (42.58 ) घसघशीत जास्त आहे. त्यानं टेस्टमध्ये 39 पैकी 14 आणि वन-डेमध्ये 30 पैकी 20 शतकं कॅप्टन म्हणून झळकावली आहेत. स्टीव्ह वॉच्या निवृत्तीनंतर ऑस्ट्रेलियानं मिळवलेल्या विजयात ग्लेन मॅग्रा आणि शेन वॉर्नचा वाटा सर्वात महत्वाचा आहे. पण त्यांच्याच बरोबरीनं पॉन्टिंगचंही तेवढंच योगदान आहे. गेली 10 वर्षे ऑस्ट्रेलियन मीडल ऑर्डरची धुरा त्यानं यशस्वीपणे पेलली आहे.
एक खेळाडू आणि कॅप्टन म्हणून तो जितका यशस्वी ठरला तितकाचं वादग्रस्तही ठरलाय. . ऍशेस सीरिजमध्ये पीटरसनला नॉट आऊट दिल्यावर अंपायरशी घातलेला वाद, भारताच्या ऑस्ट्रेलिया दौ-यात सौरव गांगुली आऊट आहे असं ढळढळीत खोटं सांगणं, ड्रेसिंगरुमचा टीव्ही फोडणे, स्मिथशी टक्कर झाल्यावर बॉल आदळणे अशा मैदानावर आणि मैदानाबाहेर घडणा-या प्रत्येक चुकीच्या गोष्टीमध्ये त्याचा सहभाग आहे.
सतत फिल्डर्सच्या जागा बदलणे आणि सहका-यांना हातवारे करत सूचना देणं ही त्याची कॅप्टनसी करण्याची शैली आहे. वॉर्न, मॅग्रा होते तेंव्हा ठिक होतं. मात्र या सतत बदलणा-या फिल्डिंगमुळे त्याच्या टीममधले अगोदरचं सामन्य असलेले बॉलर्स गोंधळून जायचे. या वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आणि भारताविरुद्धच्या मॅचमध्ये वॉटसन बॉलिंग करत असताना त्यानं स्लिप लावली नाही. त्यामुळे दोन-तीन वेळा बॅट्समनला आऊट करण्याची संधी कांगारुंनी गमावली. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये शाहिद आफ्रिदी आऊट झाल्यानंतर ब्रेट लीला बॉलिंग देणं आवश्यक होतं. मात्र तो क्रेझावरचं अवलंबून राहिला. बॅट्समन म्हणून मागच्या दिड वर्षात आलेल्या सुरु असलेल्या बॅड फॉर्माचा परिणाम त्याच्या कॅप्टनसीवरही झाला. भारताविरुद्ध त्यानं शतक झळकावलं हे खरं आहे. पण संपूर्ण वर्ल्ड कपमध्ये फॉर्म हरपलेला होता. कॅनडा विरुद्धच्या मॅचमध्ये हेन्री कोशिन्देसारख्या बॉलर्स विरुद्ध हुक त्याला मारता आला नाही. पाकिस्तान विरुद्ध मोहम्मद हाफिजनं त्याला जखडून ठेवलं. भारताविरुद्ध युवराज सिंगला एक सिक्सर वगळता तो काहीच कमाल करु शकला नाही.
फॉर्म हरपलाय, मॅच हरण्याचे नवे रेकॉर्ड होतायत तरीही तो कॅप्टनसीवरुन हटयाला तयार नाहीयं. एखाद्या राजकारण्याप्रमाणे मीच नेतृत्वासाठी कसा लायक आहे याचे दावे करण्याची सवय त्याला
जडली आहे.
हेडन आणि गिलख्रिस्टच्या निवृत्तीनंतर पॉन्टिंगवरचं ऑस्ट्रेलियाच्या बॅटिंगचा संपूर्ण भार पडलाय. त्याच्या खेळावरचं ऑस्ट्रेलियाची पूर्ण टीम अवलंबून राहिलीय. वर्ल्ड कपमध्येही पॉन्टिंग उभा न राहिल्याचा फटका टीमला बसला. संपूर्ण स्पर्धेत त्यांची बॅटिंग विस्कळीत होती. पाकिस्तान विरुद्ध तर 176 रन्समध्ये 50 ओव्हर्स न खेळताच ऑल आऊट होण्याची नामुष्की ऑस्ट्रेलियाला सहन करावी लागली.
वॉर्न आणि मॅग्रानंतर ऑस्ट्रेलियाची बॉलिंग बोथट बनली. तर हेडन- गिलख्रिस्ट रिटायर झाल्यामुळे बॅटिंगमधली आक्रमकता निघून गेली. या बुडत्या जहाजाला काडी देण्याचा प्रयत्न पॉन्टिंगनं केला. मात्र ह्या काडीची शक्ती अपूरी पडल्यानं कांगारुंचे जहाज या वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनलपूर्वी बुडाले. आता या पराभवानंतर पॉन्टिंग टीममधून जाणार हे उघड आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची अवस्था ही आणखी बिकट होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ हा काही ठराविक खेळाडूंवर अवलंबून होता. ते खेळाडू निवृत्त झाल्यानं अथवा त्यांचा फॉर्म हरपल्याने त्यांची ही अवस्था झालीय. सचिन, लक्ष्मण, द्रविड यांच्यानंतर भारतीय संघाची हीच अवस्था होऊ शकते. आज ऑस्ट्रेलियाची जात्यात असेल तर भारतीय टीम सूपात आहे असं म्हणावे लागेल.
टीप - ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरील कांगारुंचा कडेलोट हा माझा जुना ब्लॉग वाचण्यासाठी इथे क्लिक करा
19 comments:
लेख जोरदार आहेच, शंकाच नाही. सर्व गोष्टी लिहिल्या आहेतच. पण हा लेख वाचताना धक्का बसला. थोडंसं वाईटही वाटलं. लेख फक्त पॉण्टिंगबद्दलच आहे. भारत इतकी मोठी मॅच जिंकला, इतकं चांगलं केलं (फिल्डिंग चांगली ही अभूतपूर्व गोष्टी नाही का), तरी त्याचा उल्लेखही नाही. किंवा कदाचित नवीन ब्लॉग त्यावर येत असेल. पॉण्टिंगवर आधीही दोनवेळा बरंच लिहिलं गेलं आहे. पण ही वेळ वेगळी होती... असो. इत्यलम्।
khup chan blog excellent ..............
Sorry Boss. Baki sagala theek ahe. Pan ponting he Bradman nantarcha Sarvat Mahan kheladu etc navta. Steve Waugh, Mark Taylor, Alan Border he Kheladu mhanun ani manus mhanun pan mahan hote ani ahet. Glen Mcgrah, Shane warne player mhanun Khup mothe hote tyanchyach jivavar ponting maja marat hota. Te retire zalyavar tyana kai ghanta kamgiri keli ahe. Ashes 2 da harala, world cup harala... He is not gud person also. Chidka ani Cheater ahe lekacha. Kal pan ek tappa out gheun appeal karat hota bhikkarda sala. Tyamulech match jinklyavar tyachai masti utaravilyacha annand sagalyana zala.Ponting was not great as u written.
@ निरंजन मनमोकळ्या प्रतिक्रीयेबद्दल धन्यवाद.हा ब्लॉग तितकासा जमला नाही हे मला मान्य आहे. पुढच्या ब्लॉगमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करीन.
भारताच्या कामगिरीबद्दल नंतर लिहणार आहे. ही मॅच भारताच्या विजयाबरोबरच पॉन्टिंगसाठी लक्षात राहणार आहे.कादाचित त्याची ही शेवटची मॅच असेल. जबरदस्त दबाव असताना तो ज्या प्रकारे खेळला त्याला सलाम. हे पॉन्टिंगच करु शकतो.
सर्वात महत्वाचे म्हणजे तो माझा आवडता प्लेयर असल्यामुळे मी त्याच्यावर दोनदा काय दोनशेवेळा लिहीन. ( यार माझ्या मालकीचा ब्लॉग आहे. इतकं तरी स्वातंत्र्य मला दे )
@ विक्रम, खूप खूप धन्यवाद आणि ब्लॉगवर स्वागत
@ आशिषदादा, पॉन्टिंग चिडखोर आहे.खोटारडाही आहे हे मान्य. त्याची टीम हरली त्यामुळे मलाही प्रचंड आनंद झालाय. पण क्रिकेट हा कुठे आता सभ्य माणसांचा खेळ राहिलाय ? त्याचा चिडखोरपणा, भांडखोर वृत्ती ही टीमसाठी होती. जिंकण्याच्या जिद्दीतून होती.
बॉर्डर,वॉ, टेलर मोठे खेळाडू होते. पण त्यांनी वन-डे मध्ये पॉन्टिग इतकी असमान्य कामगिरी केलेली नाही.टेस्टमध्येही ते त्याच्यापेक्षा खुजे आहेत. वॉर्ननी भारताविरुद्ध काय दिवे लावले ? अगदी मुंबईच्या बॅट्समन्सनीही त्याची धुलाई केली आहे. मॅग्रा मोठा होता ठिक आहे. पण त्याच्यावर कॅप्टनसीचे ओझे नव्हते. कॅप्टनसीचं ओझं सांभाळात अशी बॅटिंग करणे खरंच ग्रेट. त्यांच्या रिटायरमेंटनंतरही ऑस्ट्रेलियाचा नंबर 1 पॉन्टिंग फॉर्मात असेपर्यंत टिकून होता.एकटा खेळाडू काही प्रत्येक वेळेस जिंकून देऊ शकत नाही.
एक कॅप्टन म्हणून आघाडीवर राहुन कशी कामगिरी करावी याचे उदाहरण म्हणजे पॉन्टिंग. त्यामुळेच तो ऑस्ट्रेलियाचा ब्रॅडमन यांच्यानंतरचा महान खेळाडू आहे.
मित्रा, बॉर्डर, मार्क टेलर आणि स्टीव्ह वॉ यांच्यावर कर्णधारपदाचे ओझे असतानाही ते कामगिरी करायचे. जर दोन्ही गोष्टी जमत नसतील तो कॅप्टन काय कामाचा? शिवाय तू वन डे बद्दल बोलतो आहेस, पण बॉर्डरच्या काळात वन डे कुठे पॉप्युलर होती. सुनील गावस्करने तरी कुठे वन डे त चांगली कामगिरी केलीय. शेवटच्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्यानं वन डेतलं पहिलं शतकं झळकाविलं. मग तो काय महान ठरत नाही का? गावस्कर सोड क्रिकेटमधला सगळ्यांचा बाप डॉन ब्रॅडमन कुठे वन डेमध्ये झळकला होता. मग तो काय महान ठरत नाही का? कसोटी, वन डे किंवा ट्वेंटी-२० मध्ये कशी कामगिरी केली यावर खेळाडूचा मोठेपणा ठरत नाही. त्यामुळे पॉटिंग फार मोठा आहे, असं अजिबात नाही. वॉर्न आणि मॅकग्राशिवाय कर्णधार म्हणून तो शू्न्य आहे हे गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये दिसलेलं आहे. अॅशेस आणि सध्याचा वर्ल्ड कप. आता ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. पहिल्या नाही आणि दुसऱ्या नाही.
त्यामुळंच पाँटिंग हा महान वगैरे नाही.
राहिला मुद्दा चिडखोरपणा आणि भांडकुदळपणाचा. सचिन तेंडुलकर पहा. दोनवेळा आऊट झाल्यानंतर थांबलाही नाही. पंचांनी नाही म्हटले तरी थांबला नाही. एकटप्पा झेल घेऊन अपिल केले नाही. सिडनी टेस्टमध्ये खोटे बोलून त्या वेडझव्या बकनरला आऊट द्यायला भाग पाडले नाही. अशा दळभद्री पाँटिंगचा धिक्कार करावा तितका कमी आहे. महान वगैरे नाही तो कोत्या मनाचा होता आणि तो संपला.
आज ऑस्ट्रेलियाची जात्यात असेल तर भारतीय टीम सूपात आहे असं म्हणावे लागेल.
हे मात्र खरे आहे .
सचिन , द्रविड , लक्ष्मन नंतर आपल्या फलंदाजीचे काय होणार देवासच ठाऊक ..
@Binarybandya,सचिन, द्रविड, लक्ष्मण गेल्यानंतर भारतीय टीमची अवस्था न्यूझीलंडसारखी होऊ शकते.
यार, पोंटिंग चे केलेल कौतुक जराही पटले नाही.अर्थात ब्लॉग तुझा आहे विचार तुझे आहे त्यामुळे तू काहीहि लिहू शकतो. पण पोंटिंग त्या लायकीचा नाही रे !! चीडीचे डाव करून, वॉर्न,माक्ग्रा, हेडन गिलक्रिस्ट सारखे खेळाडूंच्या जीवावर कोणी वर्ल्ड कप मारत असेल तर त्याला ग्रेट कधीच म्हणता येत नाही. सचिन च्या मागोमाग जरी तो असला तरी सचिन हिमालय आहे तो त्याच्यासमोर एक छोटी टेकडी पण नाही.
कालच बघ ना किती रडीचे डाव खेळायचे प्रयत्न केले. एक तरी फिल्डर चेंडू पुसत होता का ?? तसाच काळा झालेला चेंडू टाकत होते. शेवटी अंपायर ने स्वत:हून चेंडू बदलला.
भारत बरोबर खेळलेल्या टेस्ट मध्ये तर ६ निर्णय चुकीचे दिले त्यातल्या दोन निर्णयाला तरी तो जवाबदार होता. भज्जी वर मिडिया समोर आरोप करणारा तो जेव्हा सचिनने हरभजनची बाजू उचलून धरली आणि केवला सचिनच्या शब्दावर सर्व थरातून हरभजनला सपोर्ट मिळाला तेव्हा ह्या भ्याड माणसाने कमिटी समोर सांगितले के मला ग्राउंड वर काय बोलणे झाले ते आठवत नाही? असा माणूस तुला आवडतो बघून आश्चर्य वाटले.
@ आशिष सावंत, रिकी पॉन्टिंगच्या चिडखोरपणाचे, त्याच्या अखिलाडू वृत्तीचे मी समर्थन कधीच करणार नाही.तो सचिनच्या तुलनेत खुजा आहे हे पण मान्य. पण खेळ हा जिंकण्यासाठी खेळायचा असतो हे समजणा-या वर्गाच तो कॅप्टन आहे. एक कॅप्टन म्हणून टिमवर त्याची असलेली पकड,महत्वाच्या क्षणी खेळ उंचावण्याची त्याची सवय मला आवडते. मॅग्रा, वॉर्नच्या बरोबरीनं त्याचाही ऑस्ट्रेलियन विजयात महत्वाचा वाटा आहे. मागच्या दिड वर्षात त्याचा फॉर्म घसरला याचाच फटका ऑस्ट्रेलियाला बसलाय.
ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत तीनवेळा वर्ल्ड कप जिंकला. मात्र त्यांना कधीही प्रेक्षकांची मनं जिंकता आली नाही. त्यामुळं त्यांच्या पर्वाची अखेर मनाला हुरहुर लावत नाही.
@ संतोष, ऑस्ट्रेलियाने कधीही प्रेक्षकांची मनं जिंकता आली नाही. त्यामुळं त्यांच्या पर्वाची अखेर मनाला हुरहुर लावत नाही.
अगदी बरोबर आहे. ऑस्ट्रेलिया हरल्यामुळे मला देखील खूप आनंद झाला. प्रतिक्रीयेसाठी धन्यवाद
नमस्कार. ब्लॉग कधी?????
ओंकार मित्रा तुझा ब्लॉग खुपच छान आहे. अभ्यासपूर्ण हा तू ब्लॉग लिहलाय याबद्दल तुझं सर्वात आधी अभिनंदन...आणखी एक गोष्ट म्हणजे ब्लॉग बरोबर मी त्यावरील प्रतिक्रियाही वाचल्या यात आशिष चोंडकर यांची प्रतिक्रियाही भावली...केवळ वा..वा करण्यापेक्षा सजग वाचकाच्या भूमिकेत त्यांनी मांडलेली प्रतिक्रिया यातच तुझ्या ब्लॉगचं यश आहे..मी क्रिकेटचा विश्लेषक किंवा अभ्यासक नाही. जेमतेम क्रिकेटचा जाणकार हवं तर स्टेडियममधला प्रेक्षक एव्हढीच आपली ओळख, पण तुझ्या ब्लॉगमधून माझ्या ज्ञानात भर पडली. असेच ब्लॉग याहीपुढे लिहित रहा.
ओंकार मित्रा तुझा ब्लॉग खुपच छान आहे. अभ्यासपूर्ण हा तू ब्लॉग लिहलाय याबद्दल तुझं सर्वात आधी अभिनंदन...आणखी एक गोष्ट म्हणजे ब्लॉग बरोबर मी त्यावरील प्रतिक्रियाही वाचल्या यात आशिष चोंडकर यांची प्रतिक्रियाही भावली...केवळ वा..वा करण्यापेक्षा सजग वाचकाच्या भूमिकेत त्यांनी मांडलेली प्रतिक्रिया यातच तुझ्या ब्लॉगचं यश आहे..मी क्रिकेटचा विश्लेषक किंवा अभ्यासक नाही. जेमतेम क्रिकेटचा जाणकार हवं तर स्टेडियममधला प्रेक्षक एव्हढीच आपली ओळख, पण तुझ्या ब्लॉगमधून माझ्या ज्ञानात भर पडली. असेच ब्लॉग याहीपुढे लिहित रहा.
ओंकार मित्रा तुझा ब्लॉग खुपच छान आहे. अभ्यासपूर्ण हा तू ब्लॉग लिहलाय याबद्दल तुझं सर्वात आधी अभिनंदन...आणखी एक गोष्ट म्हणजे ब्लॉग बरोबर मी त्यावरील प्रतिक्रियाही वाचल्या यात आशिष चोंडकर यांची प्रतिक्रियाही भावली...केवळ वा..वा करण्यापेक्षा सजग वाचकाच्या भूमिकेत त्यांनी मांडलेली प्रतिक्रिया यातच तुझ्या ब्लॉगचं यश आहे..मी क्रिकेटचा विश्लेषक किंवा अभ्यासक नाही. जेमतेम क्रिकेटचा जाणकार हवं तर स्टेडियममधला प्रेक्षक एव्हढीच आपली ओळख, पण तुझ्या ब्लॉगमधून माझ्या ज्ञानात भर पडली. असेच ब्लॉग याहीपुढे लिहित रहा.
ओंकार मित्रा तुझा ब्लॉग खुपच छान आहे. अभ्यासपूर्ण हा तू ब्लॉग लिहलाय याबद्दल तुझं सर्वात आधी अभिनंदन...आणखी एक गोष्ट म्हणजे ब्लॉग बरोबर मी त्यावरील प्रतिक्रियाही वाचल्या यात आशिष चोंडकर यांची प्रतिक्रियाही भावली...केवळ वा..वा करण्यापेक्षा सजग वाचकाच्या भूमिकेत त्यांनी मांडलेली प्रतिक्रिया यातच तुझ्या ब्लॉगचं यश आहे..मी क्रिकेटचा विश्लेषक किंवा अभ्यासक नाही. जेमतेम क्रिकेटचा जाणकार हवं तर स्टेडियममधला प्रेक्षक एव्हढीच आपली ओळख, पण तुझ्या ब्लॉगमधून माझ्या ज्ञानात भर पडली. असेच ब्लॉग याहीपुढे लिहित रहा.
मयूरेश मित्रा माझा ब्लॉग वाचलास आणि इतकी सविस्तर प्रतिक्रीया दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद
Post a Comment