Tuesday, August 18, 2009

शाहरुख पब्लिसिटी खान


शाहरुख खान या बॉलिवूडच्या एका अभिनेत्याला चौकशीकरता अमेरिकेतल्या नेवार्क या विमानतळावर थांबवण्यात आलं.त्याच्या सर्व कागदपत्रांची चौकशी करण्यात आली. तो ग्लोबल आयकॉन आहे. अमेरिकेसह संपूर्ण जगात त्याचे फॅन्स आहेत.भारतामधील अगदी वरपर्यंतच्या वर्तुळात त्याच्या ओळखी आहेत.अगदी कशाचाही त्या खडूस तपासणी अधिका-यांवर परिणाम झाला नाही.त्यांचे संपूर्ण समाधान झाल्यानंतरच त्यांनी त्याची मुक्तता केली.खरंतर शाहरुख सारख्या सेलिब्रिटीनी हा विषय समंजसपणे हाताळायला हवा होता.पण माझं नाव मुस्लिम आहे म्हणूनच मला थांबवण्यात आलं.असा दावा त्यानं केला.

एप्रिल महिन्यात माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दूल कलाम कॉन्टिनेंटल एअरलाईन्सनं दिल्लीहून न्यूयॉर्कला जात होते. विमानाकडं जात असताना विमानाच्या चार कर्मचा-यांनी त्यांना वाटेतच थांबवलं. आणि त्यांची झडती सुरु केली. कलामांनी कसलाही विरोध न करता सर्व प्रक्रिया पुर्ण केली. सुरक्षा रक्षकांनी सांगितलं, बुट काढा तर त्यांनी तेही केलं. त्या टिनपाट कर्मचा-यांपुढं आपला रुबाब गाजवावा असं त्यांना चुकूनही वाटलं नाही.

ह्या विषयावरचे नेटवरील संदर्भ अभ्यासत असताना माणिक मुंढे या माझ्या जुन्या सहका-याने त्याच्या ब्लॉगवर लियो टॉलस्टायबद्दलचा लिहलेला एक प्रसंग वाचण्यात आला.हा प्रसंग जशाच्या तशा लिहण्याचा मोह मला होतोय.टॉलस्टॉय त्यावेळेस रशियन सैन्यात कार्यरत होते. ते आपल्या काही सैनिकांची स्टेशनवर वाट पाहत होते. मॉस्कोत गोठवणारी थंडी असते त्यामुळे त्यांच्या अंगावरच्या कपड्यांमुळे कोण लष्करातले आणि कोण सर्वसामान्य हे काहीच कळत नव्हतं. एक बाई तिथं आली. तिला वाटलं, हा उभा असलेला गृहस्थ कुली आहे. तिनं टॉलस्टॉयला गाडीतलं सामान उतरायला सांगितलं. टॉलस्टॉय काही वेळ गोंधळले. पण त्यांनी पुढच्याच क्षणी त्या बाईचं सगळं सामान ऊतरवून दिलं. तितक्यात तिथं सैनिक आले आणि त्यांनी टॉलस्टॉयला सॅल्यूट ठोकला. त्या बाईला काही कळेच ना! हे सैनिक एका कुलीला का सॅल्यूट मारतायत? त्या बाईनं विचारल्यानंतर टॉलस्टॉयनं आपली ओळख करून दिली. त्या बाईचा विश्वासच बसेना. आपल्यासमोर सार्वकालीन महान कादंबरीकार उभा आहे. एवढच नाही तर त्यानं आपलं सामानही उतरवून दिलं. बाई खजिल झाल्या. त्यांनी टॉलस्टॉयची माफी मागण्याचा प्रयत्न केला. पण टॉलस्टॉयनेच त्यांचे आभार मानले, ते त्यांनी दिलेल्या कामाबद्दल. एवढच नाही तर कुलीला देणार होत्या ती रक्कमही टॉलस्टॉयनं स्विकारली.

हे तीन प्रसंग आहेत तीन वेगवेगळ्या व्यक्तींचे..तीन्ही व्यक्तींनी आपल्या क्षेत्रामध्ये आपलं कर्तुत्व सिद्ध केलंय. हे कर्तुत्व सिद्ध केल्यानंतर जो समंजसपणा यायला हवा तो शाहरुखमध्ये आलाय..असं काही वाटतं नाही. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून मुस्लिम नट टॉपला आहेत. ' खान ' नावांच्या खानदानाची कितीतरी उदाहरणं आहेत. त्यांना सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक मिळाल्याची बातमी कधी तरी आल्याचं आठवतंय का ? परंतु घर नाकारलं गेल्यावर किसर किंग इमरान हश्मीलाही तो मुस्लिम असल्याचा साक्षात्कार होतो.अमेरिकेत तपासणी झाल्यावर शाहरुखला मुस्लिम म्हणून मिळणारी सहानभूती कॅश करण्याचा प्रयत्न करतो.

अमेरिकन नागरिकांमध्ये मुस्लिमांबद्दल खरचं द्वेष असाता तरं बराक हुसेन ओबामा हे अमेरिकेचे अध्यक्ष कसे झाले असते ? अमेरिकेमध्ये आज लाखो मुस्लिम नागरिक राहातायत.त्यामधील अनेक उच्च पदावर कार्यरत आहेत. पाकिस्तानसह अनेक मुस्लिम राष्ट्रांमध्ये गैरमुस्लिम नागरिकांना मिळणा-या वागणुकीपेक्षा कित्येक पटीनं सन्मानाची,प्रतिष्ठेची आणि बरोबरीची वागणूक या मुस्लिमांना मिळते.

9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेमधील परिस्थीती झपाट्याने बदललीय. सर्व सार्वजनिक ठिकाणी अगदी काटेकोरपणे तपासणी केली जाते. कोणत्याही व्यक्तीची तपासणी होत असताना त्याची प्रतिष्ठा,पद समाजातील राजकीय स्थान कशा कशाचाही विचार केला जात नाही.अमेरिकेत जाऊन आलेल्या लाखो भारतीयांनी याचा अनेकदा अनुभव घेतलाय.परंतु त्यांनी त्याचा कधीही ब्रभा केला नाही.अमेरिकेत येणा-या,वावरणा-या प्रत्येक नागरिकांच्या हलचालींवर अमेरिकन सुरक्षा अधिका-यांचे बारीक लक्ष असते.त्यामुळेच अमेरिकेवर 9-11 नंतर एकही मोठा हल्ला होऊ शकला नाही.त्याच्या नेमक्या उलट आपल्याकडची परिस्थिती.26-11 नंतर आपण सतर्क झालो.असा एक समज आहे.पण आजही सीएसटी स्टेशनच्या परिसरात अगदी सहजपणे वावरता येतं..मेटल डिटेक्टर सुरक्षा अधिकारी काय आणि कसे काम करतात याची अनुभती अनेक जण रोज घेत असतात.त्यामुळेच या देशात कुठेही आणि कधीही अगदी सहज हल्ला होऊ शकतो.

देशातील सरंजामशाही नष्ट झाली.संस्थानिकांचे तनखे रद्द झाले.मात्र तरीही या देशातीन अनेकांच्या रक्तातील संरजामी गूण गेली नाही.उलट राजकारणी,सनदी नोकरशाहा,चित्रपट कलावंत,क्रिकेटपटू यांच्यातील सरंजामदाराची नवीन जमात या देशात निर्माण झालीय.आपल्या देशात मिळणा-या व्हीव्हीआयपी वागणुकीची त्यांना इतकी सवय झालीय की त्यांना परदेशातही हीच वागणूक मिळावी अशी अपेक्षा असते.

लालु प्रसाद यादव, शिवराज पाटील, मुलायमसिंग यादव, रामविलास पासवान अशा सत्तेत नसलेल्या लोकांची झेड दर्जाची सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकार घेत आहे, याचा सुगावा या मंडळींना लागला आणि त्यांनी अख्खी संसद डोक्यावर घेतली. या कसलाही धोका नसलेल्या नेत्यांच्या सुरक्षेसाठी सरकार दरवर्षी पाचशे कोटी रूपये खर्च करतं. या पाचशे कोटींमध्ये विकासाची कित्येक काम होऊ शकतात.आपल्या देशात अशीही एक व्यक्ती आहे, ज्याची कधीही, कुठेही झडती घेतली जाऊ शकत नाही. विशेष म्हणजे, तो कधी या देशाचा पंतप्रधान नव्हता वा राष्ट्रपती. तो कधी सरन्यायधीशपदावरही राहिलेला नाही.ही व्यक्ती आहे पंडित नेहरुंचा पणतूजावाई,इंदिरा गांधीचा नातजावाई,सोनिया गांधींचा जावई आणि प्रियंका गांधीचा नवरा रॉबर्ट वढेरा.गांधी घराण्याचा जावाईच हीच त्याची एकमेव ओळख.केवळ याच गोष्टींमुळे तो देशातील सर्वशक्तीशाली नागरिकांमध्ये जाऊन बसतो.

शाहरुखच्या चाहत्यांना हा संपूर्ण देशाचा अपमान वाटला.आपल्याकडे ही बातमी गाजत असताना अमेरिकेत आणखी एक प्रकार घडला. बॉब डिलन या वयोवृद्ध अमेरिकन संगीतकाराला एका चौकशी अधिका-याने अडवलं.बॉब डिलन आज ८४ वर्षांचे आहेत. गेल्या पाच दशकांत त्यांच्या संगीताने जगभरातल्या संगीतकारांवर प्रचंड प्रभाव टाकला आहे. अमेरिकेसह जगभरातल्या संगीत रसीकांवर त्यांच्या गाण्यांची मोहिनी आजही कायम आहे.असे हे जगप्रसिद्ध बॉब डिलन अमेरिकेतल्या एका चौकशी अधिका-याच्या 'अपमानास्पद' वागणुकीला सामोरे गेले. परंतु बॉब यांनी आपण संगीतकार आहोत,वृद्ध आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे सेलिब्रिटी आहोत..असा कोणताही गवगवा केला नाही.

ऑल आर इक्वल बट सम आर मोअर इक्वल.या जॉर्ज ऑरवेल यांच्या वाक्याची सतत आठवण येत राहते..मोअर इक्वल या प्रकारात मोडणारे अनेक शाहरुख आपल्या देशात आहेत.त्यांच्या या समजूतीला कोणी धक्का दिला की काही जण आदळाआपट करतात.कुणाला तो दलित महिलेचा अपमान वाटतो तर कुणाला आणखी काही..शाहरुख सारखे काही हूशार व्यक्ती त्याचा पब्लिसिटीसाठी वापर करुन घेतात.या देशातील भोळी-भाबडी जनता मात्र त्यांच्या अशा नाटकी वागण्याला बळी पडते.त्यांचा अपमान हा स्वत:चा अपमान समजते. कोणी आपला आपल्या स्वार्थी हेतूसाठी वापर करुन घेतयं हे त्यांच्या गावीही नसतं.सरंजामशाही नष्ट झाले, संस्थानिकांचे तनखे रद्द झाले परंतु संस्थानिकांना देव समजण्याची खास भारतीय प्रवृत्ती अजूनही नष्ट झालेली नाही.

भारतीय मनोवृत्ती आणि अमेरिक मनोवृत्तींमध्ये असलेला हा एक सर्वात मोठा फरक.अमेरिकेची बरोबरी करायाला निघालेल्या आपण सर्वांनी सुरवातीला ही मनोवृत्ती बदलायला हवी.पण याची तयारी किती जणांची आहे ?

12 comments:

आशा जोगळेकर said...

Khoopach chhan lihilay. yach batmee warchya anek lekahn madhe utkrusht.

Anonymous said...

Very well said.. Nice post!

Gireesh Mandhale said...

Great post! What else to say..

Shirish Garje said...

tujha mhanane patat aahe pan thoda jar ka common man chya najretun jar pahila tar USA limits cross karat aahe aasa vatat nahi ka.. ? fakt aaplya sobatach ka ashya ghatnanchi punaravrutti hote..? aani shevati aapan ka mhanun sahan karayche? aapna kai USA kadun bhik ghet nahi. swatachya himativar aapan mahasatta mahunu vatchal karat aastana aapan USA la kadhich maaf karta kama naye aase mala personaly vatate...

akhildeep said...

आपल्या म्हणण्यात तथ्य आहे.. पण मुस्लिम लोकांच्याच अशा चाचण्या होतात हेही खोटे नसावे!new york times वर ’पटेल’ नावाच्या बाईने म्हटलंय की तिचं असं चेकिंग कधीच झालं नाहीये.कलाम साहेब आणि आता खान.मी मुस्लिम नाही किंवा शाहरुख समर्थकही नाही. या अशा आपल्या ’पद्मश्रीं’ना आपण सपोर्ट करणार नसू तर ते चूकच आहे. ते त्याला ओळखत नसतील,पण त्याला २ तास एक फोनही करु दिला नाही..निदान त्याच्या कार्यक्रमाच्या आयोजकांनी तरी ओळख पटवून दिली असती कि नाही? ब्रॅड पिट आणि ऍंजेलिना जोली सारखं कोणी आलं तर त्यांची अशीच तपासणी केली पाहिजे! [:)]

Unknown said...

chhan lihile aahe.suraksha adhikaryanee tyanche kam kele. koneehi kitihee prasiddha aso kinva naahee tyanee asha goshteena virodh karne chuk aahe.

अनामिक said...

खूप संयत लिहिलं आहे तुम्ही. प्रत्येक मुद्दा पटला.
वर राज म्हणताहेत की अमेरिका लिमीट क्रॉस करते आहे. अरे देश त्यांचा, नियम त्यांचे, तिथे जाण्याची गरज आपली मग एवढा आरडाओरडा कशासाठी. म्हणे बर्‍याच मुस्लीम लोकांची चौकशी होत आहे. मान्य की सगळे मुस्लीम वाईट नाहीत, पण अतिरेकी कारवाया करणारे, आणि जे पकडले जातात ते मुस्लीमच आहेत. मग स्व्-संरक्षणासाठी अमेरिकेने त्या लोकांची चौकशी/तपासणी केली तर बिघडले कुठे? शिवाय शहारुख काही अमेरिकेचा पाहुणा म्हणून इथे आला नव्हता. तो इथे पैसे कमवण्यासाठी आणि त्याचा चित्रपट प्रमोट करण्यासाठी (परत उद्देश पैसे कमावण्याचाच) इथे आला होता. आणि तो भारतात मोठ्ठा स्टार आहे ते इथल्या लोकांना कसे कळणार? इथले भारतिय सोडले, तर इथलं कुत्रही शाहरूख खानला ओळखत नाही. आपल्या इथले सो कॉल्ड व्हिआयपी लोक ना कुपमंडूक आहेत, त्या डबक्या बाहेरही जग आहे ते त्यांना माहीतच नसतं. मी तर म्हणतो झाल्या प्रकारामुळे त्याला अमेरिकेत यापुढे एंट्रीच देऊ नये.
खंत याची वाटते की आपल्या इथले मंत्रीसुद्धा काही काम धंदा नसल्यासारखे या विषयात नाक खुपसताहेत. त्या अंबीका सोनीला ति स्वतः काय बरळते आहे याचेपण भान नाही. आणि काल चिदंबरमने पण हे प्रकरण वरपर्यंत घेऊन जाऊ असे म्हंटले आहे म्हणे. काय हा बावळटपणा. असा काही प्रकार पाहिला की फार चिडचिड होते... पण गप्प बसण्याखेरीज आपण काहीच करू शकत नाही.

santosh gore said...

आपल्या धर्मनिरपेक्ष देशात जात आणि धर्माचं कार्ड केव्हा काढलं जाईल याचा काही नेम नाही. 9/11 च्या हल्ल्यानंतर शाहरूख कितीतरी वेळेस अमेरिकेत गेला असेल. 'कल हो ना हो' सह कित्येक चित्रपटांचे शुटींगही 9/11 नंतर झालंय. तेव्हाही शाहरूखची तपासणी झालीच असेल. मात्र आता शाहरूखचा हा थयथयाट तपासणीसाठी नव्हे तर तो पब्लिसिटीसाठीच होता हे सिद्ध होतं. कारण त्याचा आगामी चित्रपट माय नेम इज खान, प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. त्यामुळेच खानसाबने ही नौटंकी केली असावी. ओसामा बिन लादेन नंतर जगातील सर्वात लोकप्रिय मुस्लीम असल्याचं विधानही शाहरूख खानने केल्याचं ब-याच जणांना आठवत असेल. त्यावरून या निधर्मी खानची पाऊले आता राजकारणाकडे वळत असल्याचंही दिसून येतंय. या सारख्या लोकांना भारतीय म्हणून मिळणा-या सोयी आणि मानसन्मानही हवा असतो मात्र यात काही कमतरता झाली तर त्यांचे मुस्लीम कार्ड केव्हाही खेळता येते. ( इम्रान हाश्मीचा 'किस्सा' आठवतच असेल.

Unknown said...

barobar aahe tuza pan

nanyala dusari baju hi asu shakel na

ramraje said...

Ram Ram.. Onkar.
tuze mudde changle ahet.. pan kahi muddyavar savistar bolto. ektar tolstoy cha example ya incidence shi lagu hot nai. tyamule tyacha sandarbh ka dila mala tari kalala nai. ha pn tyane tya mahilechi madat keli tyala kamipanach vatla nai he tyache mothepan. karan madat karayla konihi nai mhannar nai. tyani tyanchya deshat tethil mahilela madat keli. tich ghatna dusrya deshat asti tari tyani madat keli astich.
pan shahrukh chi inquiry hi bab jara vegli. karan tolstoychi 2 tass choukashi keli asti tar? ani kadachit tolstoy aatachya situation madhe asta ani tyathi muslim asta tar? mala vatata tyala pan khatakla asta. russai ani mediala pan.
aplya deshat anek truti ahet.. ramvilas pasvan, lalu prasad yadav, mulaym singh, shivraj patil yanchyavr surakshesathi honara kharchat anek kame hotil. he mala manya ahe. mi ani konihi tyach matacha asel. shevti paise aplya khishyatun jatat na. ase anek problem aplya ithe ahet. te apanch solve karaychet. ithe USA yenar nai. ya muddyachi swatantra charcha vhyayla havi. karan tu upstith kelele muddyavarch vegla debet hou shakta. priyankacha navra vadhera hahi VVIP rank madhe jaun basto. keval gandhi gharanyashi relation mhanun tyala ghusu detat kuthehi. parat tech ki aplya deshat he sagla hotay. he badalnyachi aplich jababdari ahe.
mudda ha nahi ki Bhartatle lok kase vagtat? mudda ha ahe ki Bhartiy lokana America kase vagavte.
are Bhartatla President jato tyachi checking keli jate. shahrukh khan jato tyachi pan tapasni keli jate. thik ahe tapasni karavi. securitychya drashtine USA ne he sagla karava. parantu kiti vel 2 tass. kalam kashavarach mat vyakt karat nai. te contraversyt padat nait. te mahantech lakshan ahe. pn aata hi vel aali shahrikhvar. ani jyana shahrukh mahit asel tyana kalelach ki shahrukh kiti swabhav kasa ahe. to kiti spasht ahe. are Chota shakeelche lok tyala dhamki dyayla gele hote tar to bindass mala marun taka. pan tuza aikun film karnar nai. asa mhanala hota.
shahrukh ha famouse actor ahe. jagbhrat tyache chahte ahet. ani to already evda famous ahe ki tyala ajun publicitychi garajach kay? to jithe jato tithe yash miltach tyala. are kolkata night rider team harli tari sarvat jast profit shahrukhlach zalay. tyane he sucess kashtane kamavlay. media la tar karanach pahije asta. shahrukh bolala tari tyachya virodhat nai bolala tari problem. shahrukhchya aivaji dusra koni asta tar kadachit evdi mothi batmi banli nasti. kalam ani shahrukh he koni chinchpoklit bhadyachya kholit rahnare samanya lok nahit. tyani aplya kshetrat utkrasht kam kelay mhanunach te top la ahet.
Bhartatun Americet janara pretek bhartiyacha apman mhnje apla apman. Bhartacha apman ahe. Bagha US chi security kiti strong ahe kalam ani shahrukhla suddha sodla nai..tyani checking vhyaylach pahije te kon lagun gelet..ase kuthvar US che godve gaat basnar. asech kai loka hoti tyamule tar engrajani evde varsh Bhartavar rajya kela. US madhe janara pretekjan Deshach chehra asto. Shahrukh ne americet jaun crime kela tar tithe Bhartacha nav kharab hota. ani tithe tyala kai zala tar ti jababdari purn americechi aste. Pratekjan deshachi Identity asto. aplya deshachi olakh gheun to gelela asto. ani tyala changli vagnuk dena he Americecha kartavya ahe. Nemka ithach ghoda pendh khata. tya US adhikaryana 2 tass ha kon ahe he kalala nai mhnje atich zala. are tyane google serch marla asta tari tyala kalala asta shahrukh kon ahe.

ramraje said...

Shahrukh pulicity stunt comment continue..

Khara tar 26/11 pasun USA la muslim lokanchi alergy zaliye. pratekakade sanshyit najrena baghitat. Prash Deshachya Asmitecha ahe. to shahrukh aso ki samanya manus tyacha US ne sanman karaylach hava. ani Shahrukh tar world famous actor.
tyanantar tu khan company ani imran hasmi cha reference dila. pn he sagle alikadche badal ahet. muslim lokana shanshayanech pahila jata. Ani ameriket tar 9/11 nanter sagla badlunach gelay. muslimavar hot aslelya anyachi kititari batmya chhapun aalyat. aata USA che president Barack obama la nivdun dila he barobar ahe. pan 2 number var gorya varnache john maccain hotech ki. ani mahatvachi bab mhnje ya veles youngsters ni vote kela. obama ne tasa badlacha vishwas dila mhanun. 221 varshyachy paramparet pahila krishn varniy USA cha President zalay. varshanu varshe varn dwesh challay tithe. martin luther king chi hatya karnyat aali. jessi jackson nivdnukit harle. nixon, regan, clinton ani bush pita putra hach chehra hota amerikecha. Obama hi badlachi suruvat asli tari purn badal asa mhanana yogya honar nai. kahi pravrutti rahtatach ki.
Thodkyat kay..
Shahrukhla publicitysathi hapaplela nai. he tyachya yashavarun kalte. ani to actor ahe.. ha sarv publicity stunt ahe yachya palikade jaun pratekane jara vichar karava. ani aplya deshatle problemcha apanch soksha moksha lavaychay. tyamulech mi parat mhantoy.. mudda bhartiyani bhartat kase vagale, kase vagave ha nai tar Bhartiy lokana America kase vagavte. kinva itar desh kase vagvtat.

Shahrukh kay kalam kay kontyahi bhartiyacha kontyahi thikani apman zala tar swabhiman japnara khara Bhartiya nishedhacha karel. Dhanyawad.

Niranjan Welankar said...

अतिशय जोरदार लेख!!!!!

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...