Wednesday, January 19, 2011

वर्ल्डकपचे दावेदार ( भाग 1 )

     येत्या 19 फ्रेबुवारीपासून क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धा सुरु होतीय. क्रिकेट हा माझा अत्यंत आवडता खेळ आहे. त्यातली सर्वोच्च स्पर्धा म्हणजे क्रिकेट वर्ल्ड कप. ही स्पर्धा माझ्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याची आहे.  दर चार वर्षांनी होणा-या या क्रिकेटच्या सर्वोच्च स्पर्धेची मी नेहमीच आतुरतेनं वाट पाहत असतो.
     
     हा वर्ल्ड कप कोण जिंकणार याबाबत सध्या वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधली स्पर्धा पाहता हा अंदाज लावणं खरंच अवघड आहे. त्यामुळे मी चार भागात वर्ल्ड कपच्या दावेदारांविषयी लिहणार आहे. हे चार भाग पुढीलप्रमाणे असतील

                          भाग 1 -  पाकिस्तान आणि श्रीलंका
                           
                         भाग 2 - दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड
                             
                                         भाग 3 -  ऑस्ट्रेलिया

                                        भाग 4  - भारत


              पाकिस्तान

   क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ मानला जातो. तर पाकिस्तान हा क्रिकेटमधला सर्वात अनिश्चित टीम आहे. चढ-उतार हे खेळाचे भाग मानले जातात. पाकिस्तान टीमच्या खेळात ते नेहमीच येत असतात. ही टीम दुबळ्या टीमकडून पराभूत होऊ शकते. तर अगदी बलाढ्य टीमला एकतर्फी पराभूत करु शकते. पाकिस्तानची टीम मैदानाबाहेरच्या प्रकरणामुळे नेहमीच वादग्रस्त ठरलीय.  अनेक गुणवत्तापूर्ण प्लेयर्सचा या टीममध्ये समावेश आहे. त्यातंच हा वर्ल्ड कप भारतीय उपखंडामध्ये होत आहे.त्यामुळे पाकिस्तानला हलके लेखून चालणार नाही.

    पाकिस्तान टीममध्ये सध्या चालत असलेल्या वेगवेगळ्या वादविवादांमुळे हा ब्लॉग लिहत असेपर्यंत त्यांनी कॅप्टनचे नाव जाहीर केलेले नाही. मात्र शाहिद आफ्रिदी आणि मिसबाह- उल- हकमध्ये कॅप्टन पदासाठी मुख्य चुरस आहे.   जागतिक क्रिकेटधल्या पहिल्या  5  विस्फोटक  बॅट्समनमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. तसेच तो एक अत्यंत धूर्त असा लेगस्पिनर आहे. त्यांची ऑलराऊंड कामगिरी पाकिस्तानसाठी महत्वाची ठरेल. मोहम्मद हाफिज आणि अहमद शेहजाद हे पाकिस्तानच्या डावाची सुरुवात करतील. युनूस खान, मिसाबह-उल-हक, शाहिद आफ्रिदी अशी अनुभवी मिडल ऑर्डर पाकिस्तानकडे आहे. उमर  आणि कमरान  हे अकमल बंधूही पाकिस्तानसाठी उपयुक्त ठरु शकतात.

  इम्रान खान, वासिम अक्रम , वकार युनूसचा पाकिस्तान हा देश गुणवत्तापूर्ण फास्ट बॉलर्सची खाण आहे. मोहम्मद असिफ आणि मोहम्मद आमिर हे त्यांचे दोन अस्सल फास्ट बॉलर स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकल्यामुळे वर्ल्ड कपमध्ये नसतील. मात्र तरीही शोएब अख्तर, उमर गुल,सोहल तन्वीर आणि वहाब रियास हे चार अस्सल फास्ट बॉलर त्यांच्या टीममध्ये आहेत. ह्या चारही बॉलर्सच्या गुणवत्तेबाबत काहीच शंका नाही.  ह्या चारही बॉलर्समध्ये एकहाती मॅचचं चित्र बदलण्याची क्षमता आहे. तर अब्दुल रज्जाक हा  ऑलराऊंडर तर  सईद अजमल आणि अब्दूर रेहमान हे स्पिनरही टीममध्ये असल्यानं पाकिस्तानची बॉलिंग चांगलीच धोकादायक ठरु शकते.


    पाकिस्तानला साखळी मॅचेसमध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, श्रीलंका, केनिया, झिम्बाब्वे, कॅनडा आणि झिम्बाब्वे या टीमसोबत मॅचेस खेळाव्या लागणार आहेत. पाकिस्तानसाठी क्वार्टर फायनलचा प्रवेश हा निश्चित मानला जातोय. पाकिस्तानला पराभूत करण्याची क्षमता प्रतिस्पर्धी टीमपेक्षा त्याच टीममध्ये जास्त आहे. आपआपसातले मतभेद, बेशिस्त आणि फिक्सिंग यामुळे पाकिस्तानचे क्रिकेट अक्षरश: पोखरुन गेलंय़. देशातल्या परिस्थितीचाही या टीमला मोठा फटका बसलाय. पाकिस्तानमधलं क्रिकेट सध्या पूर्णपणे थांबलंय. या अशांत परिस्थितीमुळे देशातलं क्रिकेटपूर्णपणे थांबलंय.  या टीमनी पूर्ण क्षमतेनं आणि सर्व मतभेद विसरुन खेळ केला तर ते वर्ल्ड कप नक्की पटकावू शकतात. मात्र गेल्या चार वर्षात क्रिकेटला बदनाम करणा-या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये पाकिस्तानची टीम गुंतलेली आढळली आहे. त्यामुळे या टीममध्ये हे आणखी कोणती काळी कामगिरी करते याकडेही क्रिकेट जगाचे लक्ष असेल.


                           श्रीलंका

    भारतीय उपखंडात यापूर्वी झालेला वर्ल्ड कप श्रीलंकेनं जिंकला होता. त्या वर्ल्ड कपच्या आठवणी या स्पर्धेत श्रीलंकेला प्रेरणा देतील. 96 च्या विश्वविजेत्या टीममधला मुरलीधरन हा एकमेव क्रिकेटपटू या टीममध्ये आहे. मुरलीचा हा शेवटचा वर्ल्ड कप आहे.  या वर्ल्ड कप नंतर तो वन-डे क्रिकेटला रामराम करण्याची शक्यता आहे. श्रीलंकेच्या या सर्वात महान प्लेयरला विजयी निरोप देण्यासाठी लंका टीम प्रयत्न करेल.


   कुमार संगकारा, तिलकरत्ने दिलशान आणि महेला जयवर्धने हे बॅट्समन आणि लसिथ मलिंगा आणि मुरलीधरन हे बॉलर ही श्रीलंकेची मुख्य शक्ती आहे. असं असलं तरी श्रीलंकेला ही स्पर्धा घरच्या मैदानावर खेळायची असल्यानं या टीममधला प्रत्येक प्लेअर महत्वाचा ठरु शकतो. दिलशान आणि उपल थरंगा टीमची सुरुवात करतील. महेला जयवर्धने हा आणखी एक ऑप्शन ओपनिंकसाठी लंककेकडे उपलब्ध आहे. कॅप्टन संगकारासह समरवीरा, जयवर्धने यांच्यावर मीडल ऑर्डरची जबाबदारी असेल. एंजलो मॅथ्यूज हा गुणी ऑलराऊंडर लंकेकडे आहे. शेवटच्या ओव्हर्समध्ये हाणामारी करण्याचे काम तो चांगल्याप्रकारे करु शकतो.

   श्रीलंकेतल्या टर्निंग पिचवर मुरलीधरनला हलकं लेखण्याची चूक कोणतीच टीम करु शकणार नाही. लंकेचा हा अस्सल वाघ आपल्या घरच्या मैदानावर सावज टिपण्यासाठी सज्ज आहे. शिवाय त्याच्या मदतीला कॅरम बॉल फेम अंजथा मेंडिस आणि लेग स्पिनर रंगना हेराथही लंकेच्या टीममध्ये आहेत. फास्ट बॉलिंगची धुरा लसिथ मलिंगावरचं असेल. त्याची गोंधळात टाकणारी बॉलिंग एक्शन, निर्णायक क्षणी यॉर्कर टाकण्याची क्षमता त्याला यशस्वी बनवत आल्या आहेत. तसेच रन्स रोखून धरण्याची त्याची क्षमताही वाखणण्याजोगी आहे. मात्र मलिंगाला समर्थ साथीदार लंकेकडे नाही. कुलसेकरा आणि दिलहारा फर्नांडो ह्या फास्ट बॉलरमध्ये सातत्य नाही. अशावेळी अनुभवी चामिंडा वासची कमी टीमला जाणवू शकते. अनुभवी सनथ जयसुर्या आणि युवा स्पिनर सुरज रणदीवला टीममधून वगळण्याचा निर्णय किती योग्य आहे हे लवकरचं स्पष्ट होईल.

       श्रीलंकेला साखळी मॅचेसमध्ये  ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, केनिया, झिम्बाब्वे, कॅनडा आणि झिम्बाब्वे या टीमसोबत मॅचेस खेळाव्या लागणार आहेत. श्रीलंकेसाठी क्वार्टर फायनलचा प्रवेश हा निश्चित मानला जातोय.  1996 साली अर्जुन रणतुंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेनं  वर्ल्ड कप जिंकला. त्यानंतर क्रिकेटमधल्या मोठ्या स्पर्धत त्यांची कामगिरी नेहमी समाधानकार झालीय. 2007 मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका टीम उपविजेता होती. आता घरच्या मैदानावर वर्ल्ड कप जिंकण्याची क्षमता या टीममध्ये नक्कीच आहे.
        

14 comments:

Niranjan Welankar said...

मस्त blog मालिका आहे!!

आशिष देशपांडे said...

sundar malika aahe! pudhil post chi vaat pahat aahe..!!

Onkar Danke said...

@ निरंजन आणि आशिष खूप खूप धन्यवाद...लवकरच दुसरा ( इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका )हा लिहीन.तो पण ब्लॉग वाचा आणि तुमच्या मनमोकळ्या प्रतिक्रीया पोस्ट करा.

साधक said...

ओंकार,
रंगतदार होणार सामने असं दिसतंच आहे.
माझा अंदाज. असा क्रम राहण्याची शक्यता.
गट अ. १. ऒस्ट्रेलिया २. श्रीलंका ३. न्यूझीलंड ४. पाक

गट ब.
१. अफ्रिका २. भारत ३. इंग्लंड ४. विन्डिज

मग ऑस्ट्रेलिया- विन्डिज, लंका-इंग्लंड, न्यूझीलंड- भारत, पाक- अफ्रिका.

यातून पुढे ऑस्ट्रेलिया- लंका, भारत -अफ्रिका व शेवटचा सामना
ऑस्ट्रेलिया- अफ्रिका किंवा ऑस्ट्रेलिया- भारत असा होवू शकतो.

वरील विधाने गृहितकांवर आधारित आहे.

Onkar Danke said...

@ साधक,

तुमच्या मताशी मी ब-यापैकी सहमत आहे. मात्र इंग्लंडचा सध्याचा फॉर्म पाहता ते सेमी फायनलला जाऊ शकतील. क्वार्टर फायनलमध्ये कदाचित भारत-पाकिस्तान आमने-सामने येण्याची मोठी शक्यता आहे.
ते काहीही होऊ दे फायनल भारत-ऑस्ट्रेलिया व्हावी आणि भारताने वर्ल्ड कप जिंकावा असं मला मनापासून वाटते.

santosh gore said...

सर्व भाग वाचण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

Onkar Danke said...

@ गारु,
तुमचे सारखे अफाट सहनशक्ती असलेले वाचक असल्यामुळेच मी आजवर ब्लॉग खरडत आलो आहे.

megha kuchik said...

abhyaspurn articles aahet....pudhil articleschi vat pahat aahe...articles chhote aani paripurn aahet

सिद्धार्थ said...

लेख छान झालाय. या आधीचा "कांगारूंचा कडेलोट" देखील चांगला होता. अभ्यासपूर्ण. पाकिस्तानबद्दल जे काही लिहल आहे त्याला अनुमोदन. पाकिस्तानला पुन्हा इम्रान खानसारखा कप्तान लाभला तर ते काही करू शकतात.

Onkar Danke said...

@ मेघा, धन्यवाद..तूला तुझ्या कामात या ब्लॉगचा नक्की उपयोग होईल.

Onkar Danke said...

@ सिद्धार्थ, तुमचे पाकिस्तानबाबतचे निरीक्षण अगदी योग्य आहे. ही क्रिकेट विश्वातली अत्यंक धोकादायक टीम आहे. संकटात सापडली की उसळी मारण्याची त्यांची सवय आहे. त्यामुळे पाकिस्तानपासून सावध राहयला हवं.

Unknown said...

उपखंडात मॅच असल्याने श्रीलंकेला कमी लेखणे चुकीचे ठरु शकते, मुरलीधरन आणि मलिंगा यांच्यावर बॉलिंगची भिस्त असेल, बॅटिंगमध्ये संघाकारा, जयवर्धने, दिलशान हे बाकी टीम साठी डोकेदुखी ठरु शकतील, श्रीलंकेचा अ‍ॅंजेलो मॅथ्युज या टीमचे सरप्राइज पॅकेज ठरु शकतो. वास आणि जयसुर्या नसले तरी श्रीलंकेच्या या टीममध्ये वर्ल्डकप जिंकण्याची क्षमता आहे. मुरलीला जर मेंडिसची साथ मिळाली तर समोरच्या टीमची काही खैर नाही आणि मलिंगाचे बाऊंन्सर्स आणि यॉर्कर्स कोणत्याही बॅट्समनला तंबुचा रस्ता दाखवु शकतात. त्यामुळे श्रीलंका दुसर्‍यांदा वर्ल्डकप मिळवण्यास नक्कीच उत्सुक असणार हे नक्की.

Unknown said...

या स्पर्धेचा डार्क हॉर्स आहे तो म्हणजे पाकिस्तान. पाकिस्तानच्या टीमला अनंत प्रॉब्लेम्स आहेत, त्यांच्या ३ महत्त्वाच्या प्लेअर्सवर ICC ने बंदी घातली आहे, हे अस जरी असले तरी आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली ही टीम कोणताही चमत्कार घडवु शकते यात वाद नाही, तसच पाकिस्तानचे बॉलिंग डिपार्टमेंट खरच स्ट्रॉंग आहे, शोएब अख्तर, उमर गुल, सोहेल तन्विर मुळे एक जबरदस्त बॉलिंग कॉंबिनेशन उभे राहते आणि बॅटिंगमध्ये युनुस खान आणि मिसबाह बरोबरच आफ्रिदीसुद्धा प्रतिस्पर्धी टीमसाठी धोकादायक ठरु शकतो, पण या टीमचा सगळ्यात जास्त डेंजरस प्लेअर आहे तो म्हणजे "अब्दुल रझाक", सातव्या-आठव्या क्रमांकावर बॅटिंगला येणारा रझाक मॅच कशीही फिरवु शकतो आणि बॉलिंगमध्ये सुद्धा कमाल करु शकतो.

Onkar Danke said...

@ गौरव श्रीलंका ही या वर्ल्ड कपची प्रबळ दावेदार आहे हे एकदम बरोबर. तसेच पाकिस्तान ही देखील डार्क हॉर्स ठरु शकते. पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी सर्व वाईट घडून गेलंय. आता यापुढे जे होईल ते चांगलेच होईल या भावनेनं ते टेन्शन फ्री आणि एकत्रीत पणे खेळले तर बॉस गडबड हो सकती है !

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...