Thursday, February 18, 2010

सूपरफास्ट सेहवाग



भारतीय क्रिकेटचा आक्रमक चेहरा म्हणजे वीरेंद्र सेहवाग. आज टेस्टमध्ये टीम इंडिया ख-या अर्थाने नंबर वन बनलीय. टीम इंडियाला नंबर वन बनवण्यात सेहवागच्या खेळाचा मोठा वाटा आहे. टीम इंडियाला अनेक संस्मरणीय विजय सेहवागन एकहाती मिळवून दिलेत. सेहवागची बॅटींग पाहताना गेल्या अनेक दिवसांपासून मनात घोळत असलेल्या विचारांना या ब्लॉगमध्ये बंदिस्त करण्याचा हा प्रयत्न...


वीरेंद्र सेहवागची बॅटींग ही एखाद्या मुक्तछंदामधल्या कवितेसारखी असते. क्रिकेटमधले पारंपारिक नियम, रुढी, परंपरा यांच्यात ती कधीही अडकत नाही. कोणत्याही परंपरेत तील बंदिस्त करता येत नाही.सेंच्युरी जवळ आली तरी त्याची धावगती कमी होत नाही. समोरच्या बॉलर्सच दडपण तो कधीही घेत नाही.


कानपूर असो की कराची... मुंबई असो की मॅलेबोर्न खेळपट्टी...मॅचचा दिवस मॅचमधली सिच्युएशन यापैकी कशाचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. गेल्या दहा वर्षांत टीम इंडियाच्या बॅटनं कात टाकलीय.पूर्वी भारतीय फलंदाजांचे नाव जगात आदराने घेतलं जायचं. आता वीरेंद्र सेहवाग या नजफगडच्या नवाबाची जगातल्या सर्व बॉलर्सना दहशत वाटतेय. T-20 मध्ये 200 धावांचा पाठलाग असो अथवा टेस्टमध्ये 1 दिवसात 400 रन्स.... वीरुची बॅट चालली की कोणतही टार्गेट अशक्य नसंत. चांगल्या बॉलचा आदर करायचा... खराब चेंडूची वाट बघायची या सारख्या पारंपारिक कल्पना त्याला रुजत नाहीत. द्रविड, लक्ष्मण या सारख्या फलंदाजांप्रमाणे तो बॉलशी लोकशाही पद्धतीने वाटाघाटीही कधी करत नाही. येणा-या प्रत्येक बॉलवर तुटून पडणे एवढाच एक मंत्र त्याच्या रक्तात भिनलाय.


खेळताना त्याचे पाय हलत नाहीत... नो प्रॉब्लेम.. पण संघाचा धावफलक तरी हलतो ना.अगदी बॉलर्सला धाप लागेल इतक्या वेगाने तो पळत असतो. उसळत्या चेंडूंचा तो सामना करु शकत नाही अशी टीका नेहमी केली जाते. पण अशा चेंडूवर तो नेहमी कोसळतो असे नाही. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका या देशातल्या वेगवान खेळपट्टीवर त्याने शतक झळकावली आहेत.तंत्र हेच पूर्णब्रम्ह हे सत्य त्यानं कधीही स्विकारले नाही. वन-डे आणि टेस्ट क्रिकेटमधली सीमारेषाच त्याने पूसून टाकलीय. फक्त ड्रेस कोडमध्ये काय तो बदल. पण दोन्ही कडे रिझल्ट एकच. बॉलर्सचे डोळे पांढरे होणे.


सिक्सर आणि कॅचमध्ये नेहमीच एक धोकादायक सीमारेषा असते. सेहवाग सारख्या बॅटसमनचे नेहमी त्या धोकादायक रेषेवर वास्तव असतो. त्यामुळे चौकार किंवा षटकार खेचत शतक पूर्ण करण्याचा बेदरकारपणा त्याने अनेकदा दाखवलाय. यामध्ये तो अयशस्वी झाला तरी त्याची त्याला पर्वा नसते. कारण रेकॉर्ड, भविष्यातील टीममधील स्थानची तरतूद हा विचार त्याच्या गावीही नसत. वर्तमान काळात जगणा-या पिढीचा सेहवाग हा प्रतिनिधी आहे. त्यामुळेच वर्तमान काळात जगणा-या लाखो तरुणांचा तो आयडॉल बनलाय. जोपर्यंत तरुणांची ही पिढी आहे. तो पर्यंत वीरेंद्र सेहवाग नावाच्या वल्लीचे महत्व कायम राहणार आहे.

9 comments:

आनंद पत्रे said...

११०% सहमत!

Niranjan Welankar said...

नमस्कार. ब्लॉग चांगला लिहिला आहे. पण सेहवागबद्दल काही गोष्टींवर प्रकाश पडला नाही असे वाटते. नेहमीच्या ब्लॉगमध्ये असणारे खोलातले तपशील, संख्या ह्यात दिसल्या नाहीत. सेहवागही कधी कधी 100 च्या स्ट्राईक रेटच्या खाली खेळतो.
आणि ब्लॉग जनरल; सामान्य माणसाच्या मताप्रमाणे वाटला. अन्य लेखनामध्ये दिसणारी लेखकाची जिज्ञासू आणि संशोधक वृत्ती जाणवली नाही. इयान चॅपेलने फार महत्त्वाची चर्चा समोर आणली http://www.cricinfo.com/magazine/content/story/442012.html); ती सर्वच प्रकारच्या परफॉर्मंसबद्दल महत्त्वाची आहे. तो म्हणतो की आपण एखाद्याचं कौशल्य किंवा ग्रेटनेस ह्यावरून मोजायचा की तो किती प्रभावी/ उपयोगी आहे का किती मेथॉडिकल किंवा टेक्निकली परिपूर्ण आहे. त्याने म्हंटलं आहे की जर टेक्निकली परिपूर्ण खेळ मॅच जिंकून द्यायला उपयोगी पडत नसेल; आणि सेहवागचा मुक्तछंदी खेळ मॅच जिंकायला उपयोगी पडत असेल (उदा., इग्लंड विरुद्ध त्याने 67 बॉल 83 केले आणि भारताने 400 पेक्षा मोठं लक्ष्य पूर्ण केलं); तर त्याच्या खेळाचं महत्त्व तंत्रशुद्ध खेळापेक्षा मोठं आहे. आज आपण हेच अनेक क्षेत्रांत पाहू शकतो. कमी शिकलेले लोक जर विशेष काम करत असतील; स्वयंरोजगारातून- फ्रीलांस कामातून लोक जर जास्त काँट्रिब्युट करत असतील; तर पारंपारिक चौकटीत अडकण्याची काय गरज आहे ? सेहवाग नेमकं हेच करतो. Uncluttered असं त्याच्या ऍप्रोचचं वर्णन केलं जातं कमालीचा आत्मविश्वास, स्पष्टता, स्वत:ची युनिक शैली हे गुण त्याच्याइतके किती खेळाडूंमध्ये असतील ? त्यामुळे त्याच्या खेळात केवळ क्रिकेटच नाही; तर एक स्वतंत्र कार्यशैली, विचारशैली दिसते. आणि त्याने ती ह्या उंचीवर नेऊन ठेवली आहे; की अनेक लोकांचा तो प्रेरणास्थान आहे. अपारंपारिक तंत्राबरोबरच तो क्रिकेटच्या पारंपारिक साच्यामध्ये - सातत्य, सर्व कंडिशंसमध्ये, सर्व प्रकारच्या आक्रमणाविरुद्ध रन्स करणे, प्रदीर्घ खेळ्या, बचाव आदि सुद्धा प्रबल आहे. आणि म्हणूनच तो नवीन विचारांच्या लोकांना शोलेसारखी मोठी- प्रेरणा देणारा वीरू ठरतो. जय वीरू ! (प्रदीर्घ लेखनाबद्दल लेखकाची क्षमा मागून).वीरूच्या बॅटचे आणि लेखकाच्य लेखणीचे शोले असेच राहोत ही सदिच्छा आणि शुभेच्छा.

Chetan Mahajan said...

Very Good.....
Carry on...........
Sehwag and u also..........

Unknown said...

सेहवाग शतकाच्या जवळ आला तरी फटकेबाजी कमी करत नाही. ताण घेत नाही, हेच त्याच्या बॅटींगचं मुख्य वैशिष्ट्य आहे. बाकी टेक्निकपेत्रा रन निघणं महत्वाचं. नुसतंच टेक्निक आहे, आणि रन निघत नसतील तर त्याचा काय उपयोग.

Onkar Danke said...

@ आनंद पत्रे,
आनंदजी धन्यवाद माझा ब्लॉग वाचल्याबद्दल.. तसेच माझ्या विचारांशी सहमत झाल्याबद्दल.

Onkar Danke said...

@ निरंजन
सर्वप्रथम तुझ्या अभ्यासू प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद. तुझ्या कमेंटमध्ये तुझा क्रिकेट बद्दलचा विशेषत: सेहवागबाबतचा जिव्हाळा आणि अभ्यास जाणवतो.
तुझा आक्षेप आहे हा ब्लॉग जनरल वाटतो. तो तसा आहेच. मी सुरवातीलाच लिहले आहे की सेहवागची बॅटींग पाहताना मला जे वाटते ते या ब्लॉगमध्ये लिहलंय. बॅटींग बघत असताना रेकॉर्डबूक आणि आकेडेवारीचे जंजाळ मला आठवत नाही. त्यामुळे या लेखात आकडेवारी अधिक तपशील जाणीवपूर्वक टाळला आहे.
माझ्या अनेक मित्रांचा आक्षेप असतो की तुझे ब्लॉग बरेच मोठे असतात. त्यामुळेच अशा वाचक मित्रांसाठी हा ब्लॉग लिहला आहे. थोडक्या शब्दात ब्ल़ॉग लिहण्याचा प्रयोग मी या ब्लॉगमध्ये केलाय.
इयान चॅपेलच्या मताचा जो दाखला तू दिलायस ते मी या पूर्वीच वाचले आहे. पण दुस-याचा कोट वापरण्यापेक्षा मी मला स्वत:हला सेहवाग कसा वाटतो (कमीत कमी शब्दात आणि आकडेवारीला हात न लावता ) लिहण्याचा प्रयत्न मी यात केलाय. अर्थात इयान चॅपेल यांच्या इतका क्रिकेटवर बोलण्याचा अधिकार मला नाही. याची मला संपूर्ण जाणीव आहे.
असो पुन्हा एकदा अभ्यासू प्रतिक्रीयेबद्दल मनापासून धन्यवाद. तुझ्या प्रतिक्रीया नेहमीच दर्जेदार असतात. असे चांगले अभ्यासू वाचक हेच माझ्या ब्लॉग लेखनाचे टॉनिक आहे.

Onkar Danke said...

@ चेतन
धन्यवाद चेतनजी माझा ब्लॉग वाचला तसेच त्यावर प्रतिक्रीया दिली यासाठी

Onkar Danke said...

@ संतोष
बिनाधस्त फलंदाजी हेच सेहवागच्या खेळाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. बिनधास्तपणा हाच गुण त्याला इतरांपेक्षा वेगळा ठरवते. सेहवागबाबतचे तुमचे निरीक्षण अगदी योग्य आहे.

Unknown said...

bhai badhiya blog hai...padh k achha laga...lekin blog thoda aur bada hota to maza aata...sehwagh k liye kam ho gaya...no prob...keep it up...

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...