Wednesday, February 18, 2009

पाकिस्तान खतरेमे !


पाकिस्तान भारतामधून वेगळा झालेला देश.14 ऑगस्ट 1947 या दिवशी हा देश भारतापासून वेगळा झाला.या देशाला सुरवातीपासूनच सतत कोणत्या ना कोणत्या समस्येनं ग्रासलंय.गरीबी,गुन्हेगारी.पूर्व पाकिस्तानमधले बांगला भाषक,सिंधमधले मोहाजीर किंवा बलूची लोक..वेगगळ्या धर्म,भाषा, संस्कृती घेऊन हा देश तयार झाला.भाषेच्या मुद्यावर या देशाची 1971 साली फाळणी झाली.तरीही या देशाचे राज्यकर्ते धडा शिकले नाहीत.वेगवेगळ्या मतभेदांनी पोखरलेल्या आपल्या देशवासियांना भारताचा बागलबूवा दाखवून हे राज्यकर्ते एकत्र ठेवत.त्यावेळी त्यांचा नारा असे इस्लाम खतरेमे !
भारताला आपला कट्टर वैरी समजणारा पाकिस्तान आता संकटात पडलाय.याची कबुली दिलीय खुद्द पाकिस्तानचे अध्यक्ष असीफ अली झरदारी यांनी.आपला देश आता तालिबानींच्या विळख्यात सापडलाय.अशी कबुली त्यांनी दिलीय.पाकिस्तानमधल्या स्वात खो-यात सध्या तालिबानी दहशतवाद्यांचे वर्चस्व आहे.या भागात पाकिस्तान सरकारनं गुडघे टेकलेत.या प्रांतात शरीयत कायदा लागू करण्यात आलाय.
पाकिस्तान-अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेला हा प्रदेश तालिबानी दहशतवाद्यांचे अभयारण्य म्हणून ओळखला जातो. संपूर्ण डोंगराळ भागानं या वेढलेल्या या प्रदेशात दळणवळणाच्या सुविधा आजही अगदी प्राथमिक अवस्थेत आहेत.शिक्षण,आरोग्यच्या मुलभूत गोष्टीही या प्रदेशात पोचलेल्या नाहीत अशी माहिती वारंवार समोर येती.त्यामुळेच या प्रदेशावर नियंत्रण मिळवणं धर्मवेड्या तालिबान्यांना सोप आहे.ओसामा बिन लादेन,मुल्ला उमरसह जगातले अनेक वॉँटेड दहशतवादी याच भागात लपलेले आहेत.असा हा प्रदेश आज संपूर्णपणे पाकिस्तानच्या हातामधून निसटला आहे.
खरं तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांची राजकीय वाटचाल एकाचवेळी सुरु झाली.आज 62 वर्षांनी भारतामध्ये लोकशाहीचे मुळं अगदी घट्ट रुतलीय.तर पाकिस्तान हा फाळणीच्या उंबरठ्यावर उभा आहे.अल्ला,आर्मी आणि अमेरिका हेच तीन पाकिस्तानच्या राजकारणामधले सर्वात महत्वाचे घटक राहीले आहेत.पाकिस्तानचे लष्कर हे राजकीय दृष्ट्या महत्वकांक्षी आहे.धर्माचा दूराभिमानही पाकिस्तानच्या लष्करामध्ये आढळतो.सोवियत रशियानं अफगाणिस्तवर ताबा मिळवल्यानंतर त्यांच्या विरोधात तालिबानी तरुणांना लष्करी प्रशिक्षण देणारं पाकिस्तानचं लष्करचं होतं.तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यानंतर त्या देशाला सर्वात आगोदर मान्यता दिली ती पाकिस्ताननी.पाकिस्तानचे सरकार लष्कर यांनी जो भस्मासूर आजवर पाळला तोच आता त्यांच्यावर उलटलाय.बलूचिस्तान,वायव्य सरहद प्रांत आणि सिंध या पाकिस्तानमधल्या चार पैकी तीन प्रांतमध्ये आज अस्थिरता आहे.त्यामुळे एकट्या पंजाब प्रांतमधल्या लॉबीच्या जीवावर पाकिस्तानी राज्यकरते किती
तग धरतात हा महत्वाचा प्रश्न आहे.
पाकिस्तान हा धोक्यात सापडला असल्यामुळे ख-या अर्थानं अलर्ट राहण्याची गरज भारताला आहे.पाकिस्ताममध्ये लोकशाही सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या देशातल्या भारतविरोधी शक्ती ह्या नेहमीच सक्रीय होत असतानं दिसतात.भारताशी 1000 वर्षे युद्ध करु अशी भाषा करणारे झुल्फिकार अली भूट्टो असो अथवा काश्मिरी तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण देणा-या बेनझीर भूट्टो अथवा कारगील आक्रमण करणारे नवाज शरीफ..पाकिस्तानमधले कोणतेही राज्यकर्ते भारताशी लढण्याची खूमखूमी प्रत्येक राज्यकर्त्यांनी दाखवलीय.सध्याच्या झरदारी प्रशासनाच्या काळातच भारतावर सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला.या हल्ल्याला सर्व प्रकारची मदत पाकिस्तानमधूनच मिळाली,आता स्वात खो-यामध्ये पाकिस्तान सरकार पराभूत झालंय.स्वात खोरे किंवा पाकिस्तानमधल्या काही प्रदेशापुरती मर्यादीत असलेली तालिबानी शक्तीचा प्रभाव आता सिंध पंजाब प्रांतमध्येही निर्माण होऊ शकतो.या दोन्ही प्रांताला लागून भारताची फार मोठी सीमा आहे.त्यामुळे तालिबानी आणि अलकायदाची ही दहशतवादी लाट भारतावरही येऊन आदळू शकते.किंबहुना ही आता भारताच्या अगदी जवळ येऊन ठेपलीय.
भारताच्या अगदी जवळ या असूरी शक्ती आल्याचे पाच परिणाम भारतावर होऊ शकतात.सर्वात पहिला म्हणजे दहशतवादी हल्ल्यांची तीव्रता पूर्वी पेक्षा आणखी वाढू शकते..दुसरा परिणाम म्हणजे काश्मीर खो-यातल्या शांततेला धोका निर्माण होऊ शकतो.काश्मिरमधले फुटीरतावादी पक्ष आणि संघटनाना अशा शक्तींपासून मोठं बळ मिळू शकतं.याचा तीसरा परिणाम भारतामधल्या काही कट्टरवादी मुस्लीम नागरिकांवरही होऊ शतको.ह्या व्यक्ती तालिबानी विचारधारेच्या प्रभावाखाली आल्या तर त्या देशातल्या काही भागात नक्कीच आपलं उपद्रवमुल्य दाखवू शकतात.दहशतवादी शक्तींशी लढणा-या अमेरिकेला भारतामध्ये पोचण्याचा नवा महामार्ग या अतिरेकी संघटना तयार करुन देऊ शकतात. आणि पाचवा परिणाम म्हणजे या शक्तीच्या हातामध्ये पाकिस्तानची अण्वस्त्रे लागली तर त्या अण्वस्त्रांचा वापर ते भारतावरही करु शकतात.
त्यामुळेच सध्याच्या या परिस्थीतीमध्ये पाकिस्तान जात्यात असला तर भारत सूपात आहे असंच म्हणावं लागेल.पाकिस्तानी राज्यकर्ते आमि समाजव्यवस्थेमध्ये असलेल्या दोषामुळे पाकिस्तान आज विनाशाच्या उंबरठ्यावर उभा आहे. या सख्या शेजा-याचं घरं जळालं तर त्याचे चटके सर्वात जास्त आपल्यालाचं बसणार..ही आग लवकर विझावी याकरता भक्कम अग्नीशामक यंत्रणा उभारण्याचं आव्हानं भारत सरकारपुढं आहे.थोडक्यात प्रत्येक भारतीयांसाठी येणारी रात्र ही वै-याची असेल.

3 comments:

santosh gore said...

पाकिस्तानने जे पेरले तेच उगवले. तालिबानचा धोका दाखवत पाकिस्तानने अमेरिकेकडून मदत लाटली. मात्र अफगाणिस्तानातील तालिबानही संपला तर नाहीच उलट पाकिस्तानात तो मजबूत झाला. आता ही सगळी हिरवी सापे भारताकडे फणा काढून बघताहेत. ही वळवळ भारतात घुसण्याआधीच ठेचून काढायला हवी. कारण आपल्या देशातही या हिरव्या सापांचे अनुनयी मोहल्ल्यांच्या बिळांमध्ये वास्तव्यास आहेत. या सापांनी स्फूर्ती घेण्याआधीच त्यांचा बिमोड व्हायला हवा. नाही तर देशातल्या प्रत्येक शहराचा अफगाणिस्तान व्हायला वेळ लागणार नाही. त्यासाठी भारत, अमेरिका, युरोप यांच्या बरोबर दहशतवादाने ग्रस्त असलेल्या देशांनी एकत्रित येवून तालिबानी चिरडून टाकले पाहिजेत. मानवाधिकार वाल्यांनो क्षमस्व....

मेघराज पाटील said...

ओंकार, ब्लॉग चांगला आहे.

काही सूचना:
तुम्ही ब्लॉगच्या टेक्स्ट बॉडीमध्ये सलग मजकूर टाकत जाता, त्यामुळे वाचण्यातला आनंद जातो. किमान प्रत्येक तीन ओळीनंतर एक पॅरा असावा. म्हणजे आपला एक मुद्दा तीन, जास्तीत जास्त चार ओळीत स्पष्ट व्हावा, त्याचा दुसरा पदर तुम्हाला दुसऱ्या पॅरामध्ये घेता येईल.

विषय चांगला निवडलाय, पण त्यात तुमचं चितंन किंवा अनुभव यांनाही प्राधान्य असावं, किंबहुना वेबब्लॉगचा मूळ उद्देशच तो आहे.

तुमचा ब्लॉग आहे, म्हणून दररोज काहीतरी लिहिलं पाहिजेच असं नाही. जेव्हा कधी तुमच्याकडे काहीतरी सांगण्यासारखं आहे, तेव्हाच तुम्ही लिहायला पाहिजे.

पाकिस्तानच्या संदर्भात emma duncan यांचं breaking the curfew : A political journey thru pakistan हे चांगलं पुस्तक आहे. मिळाल्यास वाचा.

सर्वात महत्वाचं म्हणजे तुमच्या ब्लॉगवर माझी प्रतिक्रिया

पाकिस्तानची आजची अवस्था हे माझ्यामते अमेरिकेच्या परराष्ट्र धोरणाचं अपय़श आहे. तालिबान आणि पाकिस्तान सरकार यांच्यात शरीयत लागू करण्यासाठी आणि शस्त्रसंधीसाठी करार होणं ही ओबामा प्रशासनासाठी पहिला धक्का आहे.

आता ओबामा प्रशासनाने हा करार ही पाकिस्तानचा अंतर्गत विषय असल्याचं स्पष्टीकरण दिलंय. पण ती सारवासारव आहे.

अशा प्रकारचा करार होऊ घातलाय, हे अमेरिकी गुप्तचर यंत्रणांना खूप अगोदर कळायला हवं होतं. तसंच सध्या त्या भागात पाकिस्तानी सैन्यापेक्षा अमेरिकी सैनिकच जास्त असावेत.

पाकिस्तानने तालिबानसोबत केलेला करार ही पाकिस्तानची गरज आहे. कारण तालिबानच पाकिस्तानला अमेरिकेपेक्षा जवळ आहे. अमेरिका फक्त आंतरराष्ट्रीय राजकारण आणि पैसा यासाठीच पाकिस्तानला हवीय, तर तालिबान देशांतर्गत राजकारणाची गरज म्हणून, मुळात तालिबानचा जन्मच त्यासाठी झालाय.

दहशतवाद, भारत विरोध आणि मूलतत्ववाद किंवा कट्टरपंथी हे पाकिस्तानात सत्तेवर येणाऱ्या कोणत्याही सरकारसाठी जीवनावश्यक (सत्तेत टिकून राहण्यासाठी अनिवार्य) बाबी आहेत.

Niranjan Welankar said...

Changla lekh ahe. Good choice. Pan far detail vatat nahi. Reporter chya pudhe jaun facts reporting nantar kuthe tari solution kade valnyacha vichar kami disto.

Bhartat lokshahichi palemule ghatt aahet hya vakyala aadhar kay ? Ya vakyacha aadhar samajla nahi. Explain karu shakta.

Vachkanchya pratikriya hi changlya, khup specific ani guiding vatlya. Pan jast emotional hona talava.

Dhanyavad.

LinkWithin

Related Posts Plugin for WordPress, Blogger...